विकास हीच आमची जात, पंकजा मुंडेचा विरोधकांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभा निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत आम्ही कधी ही जात बघितली नाही, ना जातीच राजकारण केले , विकास हीच आमची जात आहे असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे.

पाटोदा तालुक्यातील डोगंरकिन्ही येथे शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार प्रितम मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत चौफेर टिका केली. विकास हीच आमची जात आहे. बीड लोकसभेची निवडणूक ही पुर्णतः विकासाच्या मुद्यांवर लढवली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उच्चशिक्षित आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून खासदार डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांना या आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देऊन निवडून देण्याचे आवाहन यावेळी पंकज मुंडे यांनी केले. या वेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस आमदार भिमराव धोंडे आदी उपस्थित होते.