
कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून पावसाची परिस्थिती पाहता मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक सोमवारी रात्रभर बंद ठेवण्याचा निर्णय प्रांत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत सकाळी पुन्हा पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
शनिवारी 2 जुलै रोजी रात्री परशुराम घाटात दरड कोसळली होती. तीन तासानंतर दरड हटवून वाहतूक सुरू करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असल्याने परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे सोमवारी रात्रभर परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.






























































