शिवसेनेच्या दणक्यामुळे दोनशे रोहित्र परभणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले सुमारे 200 ट्रान्सफॉर्मर नांदेडला गेल्याने शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील यांनी गेल्या महिन्यात महावितरणला घेराव घालून जाब विचारला होता. यावेळी संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला होता. शिवसेनेच्या या दणक्यानंतर सोमवारी महावितरणने परभणी विधानसभा मतदार संघातील 21 गावांना नवीन रोहित्र त्वरीत उपलब्ध करून दिले आहे.

जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्यासाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले होते. सद्यस्थितीत ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू होत्या. सध्या रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडलेले असतांना पिकांना केवळ वीजे अभावी ते पाणी देता येत नसल्याने शेतकरी त्रस्त असून दुष्काळी परिस्थिती असतांनाही महावितरणकडून ट्रान्सफॉर्मरबाबत शेतकऱ्यांना उडवा-उडवीचे उत्तरे दिले जात होती. त्याअनुशंषगाने गेल्या महिन्यात पाच नोव्हेंबर रोजी आमदार डॉ. पाटील व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयास घेराव घालून रोहित्राबाबात अभियंता लोंढे यांना जाब विचारला होता. तसेच फोनवर मुख्य अभियंता नांदेड यांच्याशी संपर्क साधून महिनाभरात मतदार संघातील वीज पुरवठा सुरळीत करण्याविषयी सांगितले होते.

यासर्व प्रकाराने महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले. याचा परिणाम म्हणून परभणी तालुक्यातील साबा, मुरंबा, आर्वी, तट्टु जवळा, ताडलिमला, नांदापूर, टाकळी कुं, मिरखेल, कात्नेश्वर, सहजपुर जवळा, वांगी, एरंडेश्वर, ठोळा, कुंभार, पेगरगव्हाण, झरी, तरोडा, पिंगळी आदी गावांना नवीन डि.पी. सोमवारी बसविण्यात आले आहे. नवीन रोहित्र उपलब्ध झाल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. यावेळी माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदुकुमार अवचार, जि.प.सदस्य रविंद्र पतंगे, जिल्हा सरपंच असो.अध्यक्ष शिवाजी चोपडे, बाळासाहेब डुकरे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, सरपंच दामोधर सानप, उत्तम मुळे, रमेश चोपडे, संजय गरूड, सुभाष बागल,कैलास भेंडे, लक्ष्मण भालेराव, रामा कदम, विजू काळे, गोविंद काळे आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांचे आभार मानले.