
संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूमुळे कोंबड्यांच्या विक्रीवर गंभीर परिणाम झाला असून यामुळे पोल्ट्री व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. पोल्ट्री व्यवसायिकांनी नुकसानभरपाई पोटी अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा गंभीर परिणाम राज्यभरातील पोल्ट्री व्यावसायावरही अप्रत्यक्षरित्या झालेला आहे. कोंबडी खाल्ल्याने कोरोनाची लागन होते, असा फतव्याने समाज माध्यमावर धुमाकूळ घातल्याने कोंबड्यांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे कोंबडीची किंमत 20 ते 10 रुपयांपर्यंत खाली घसली आहे. प्रत्यक्षात कोंबड्यांच्या पिलांचा भाव 20 रुपये प्रतीनग तर त्यासाठी लागणारे खाद्य सुमारे 5 हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत जाते. त्यामुळे 1 किलोचा पक्षी तयार करण्यासाठी पोल्टी व्यावसायिकांना 75 ते 80 रुपये मोजावे लागतात. मात्र या पक्षांच्या दरात सध्या लक्षणिय घट झालेली असून या क्षेत्रातील व्यापारी या व्यावसायिकांना 8 ते 10 रुपये किलोचा भाव देत आहेत. त्यामुळे हे पोल्टी व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. किंबहूना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाभरात एकूण 3 ते साडे तीन लाख जिवंत (कोंबड्या) पक्षी आहेत. त्यामुळे या व्यवसायिकांना नुकसानापोटी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

































































