लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्यांना दिला मदतीचा हात, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांचा पुढाकार

671

कोरोना विषाणूमुळे सध्या देशभरात लाॅकडाऊन सुरू असल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे राजस्थान, गुजरात, कर्नाटक येथील रोजंदारीसाठी भटकंती करणारे ऐंशी नागरिक देवला पुर्नवसन भागात अडकून पडले आहेत. रोजंदारीवर काम करुन उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली होती. ही घटना माजी नगराध्यक्ष पवन आडळकर व छगन शेरे यांना कळताच पवन आडळकर यांनी तत्परतेने मदतीची तयारी दाखवत घटनास्थळी धाव घेतली व संबंधितांची चौकशी करून तात्काळ प्रत्येक कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा माल देऊन सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देविदास एकबोटे, तहसीलदार बालाजी शेवाळे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, गटनेते संदीप लहाने, प्रशांत थारकर, डॉ संजय हारबडे, अविनाश शेरे, विनोद तरटे,पारस काला, सचिन राऊत, विलास पौळ, अशोक राऊत, मुकुंद आष्टीकर,शाम साडेगावकर,रामा कदम, कलिम कादरी आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या