पेट्रोल 102 नॉट आऊट!

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात परभणीत विक्री होणार्‍या पेट्रोलचा दर सर्वाधिक आढळून आला आहे. ज्यामुळे फारसे उद्योगधंदे नसणार्‍या लहानशा या शहरातील वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत.

जिल्ह्यात आजही इंधनदराचा भडका कायम असून राज्यात सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री परभणीत होत आहे. साध्या पेट्रोलचा आजचा दर 99.11 रुपये प्रति लिटर आहे. तर पावर पेट्रोलचा दर 102.54 वर जाऊन ठेपला आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपये होणार असल्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे पावर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. कोरोना महामारीत आधीच आर्थिक संकटाला सामोरे जाणार्‍या नागरिकांची इंधन दरवाढीने पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. अशा स्थितीत तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्याचे सांगितले जाते. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. परभणीतील पेट्रोल दराचा विषय हा कायम चर्चेचा ठरत आहे

आपली प्रतिक्रिया द्या