पारनेर येथे हायड्रोक्लोराईड युक्त फवारणी

अंबड तालुक्यातील तालुक्यातील पारनेर येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकी करण्याकरिता ट्रॅक्टरद्वारे स्प्रे मारून फवारणी करण्यात आली. यावेळी निर्जंतुकीकरण करण्याकरिता हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी करण्यात आली.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून पूर्ण गावात ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावात फवारणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या