धर्माच्या बुरख्याआड दांपत्याचा खोटारडेपणा, तन्वी सेठचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनौ

धर्माच्या नावाखाली आपला छळ करत पासपोर्ट नाकारल्याचा आरोप करणाऱ्या तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी यांचा खोटारडेपणा हळूहळू उघड होऊ लागला आहे. अनस सिद्दीकी याच्याशी तन्वी सेठ हीने लग्न केलं आहे, मात्र तिने पासपोर्टसाठीच्या अर्जात सादिया हसन (लग्नानंतर बदललेले नाव) हे नाव पासपोर्टमध्ये न देता तन्वी सेठ असंच नाव लिहलं होतं. तन्वी सेठने तिचा पत्ताही खोटा दिला होता. ही बाब विकास मिश्रा या पासपोर्ट अधिकाऱ्याने उघडकीस आणला होती. यामुळे या दांपत्याने मिश्रा यांच्यावर धर्माच्या नावावर छळ केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर तन्वी सेठला ताबडतोब नवा पासपोर्ट देण्यात आला तर अनस सिद्दीकी याच्या पासपोर्टला मुदत वाढ दिली होती. विकास मिक्षा ज्यांनी या दांपत्याला नियमानुसार आडकाठी केली होती, त्यांची मात्र सरकारने तडकाफडकी बदली केली होती.

तन्वी सेठने केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्यता आहे हे तपासण्यासाठी स्थानिक गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी तन्वी सेठने दिलेल्या पत्त्यावर गेले होते. जो पत्ता तन्वीने दिला होता तिथे तिचे सासू सासरे रहात होते, हे दोघेही जण तन्वी तिथे एक वर्षांपासून अधिक काळ रहात होते याचा कोणताही पुरावा देऊ शकले नाही. तन्वी ही नोएडा इथे रहात असून तिने तिथल्या पासपोर्ट कार्यालयात अर्ज करण्याऐवजी लखनौच्या कार्यालयात अर्ज केला. पासपोर्टसाठी जो पत्ता दिला आहे तिथे एक वर्षांपेक्षा अधिक काळ तन्वी सेठ वास्तव्य करत नसल्याचं आढळल्यास तन्वीला दोषी ठरवून तिचा पासपोर्ट रद्द केला जाऊ शकतो.