पेटीएमचा आयपीओ 18 हजार 300 कोटींचा! देशातील सर्वात मोठा आयपीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची डिजिटल कंपनी पेटीएमचा तब्बल 18 हजार 300 कोटी रुपयांचा आयपीओ सोमवारी खुला झाला. हा आयपीओ देशाच्या व्यावसायिक इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून नोंद झाला असून कंपनीने कोल इंडियाच्या नावावरील विक्रम मोडीत काढला आहे. 2010मध्ये कोल इंडियाचा 15 हजार 475 कोटींचा आयपीओ आला होता.

पेटीएमचा आयपीओ उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी सोमवारी 18टक्के लोकांनी या आयपीओचे सदस्यत्व घेतले. याव्यतिरिक्त किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात आलेले 78 टक्के शेअर्स सब्सक्राइब झाले आहेत. यातून मोठ्या गुंतवणूकदारांपेक्षा किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये अधिक क्रेझ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेटीएमचा आयपीओ 10 नोव्हेंबरपर्यंत खुला असणार आहे.