Photo – 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात ‘या’ देशातील लोक, जाणून घ्या जीवनशैलीचे रहस्य

आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे माणसांचे आयुष्य हळूहळू कमी होत आहे, मात्र जगात अशी पाच ठिकाणे आहेत, जेथील लोकांचे आयुष्यमान 100 वर्षांपेक्षाही जास्त आहे. जाणून घेऊया या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या रंजक जीवनशैलीविषयी –

ग्रीसमधील इकारिया हे ठिकाण दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात अशी काही ठिकाणे आहेत, जेथे लोकं 100 वर्षांहून अधिक जिवंत राहतात. अशा ठिकाणांना येथे ‘ब्लू झोन’ म्हटले जाते. सामान्य माणसाचे सरासरी आयुर्मान आणि येथे राहणाऱ्या लोकांचे सरासरी आयुर्मान यात मोठा फरक आहे.

ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी आयुर्मान 100 वर्षांपेक्षा जास्त असते. इटलीमध्ये असलेल्या सार्डिनियाच्या लोकांचे आयुष्यही जास्त आहे. शास्त्रज्ञांनी ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांची तपासणी केली असता त्यांना अनेक मोठे खुलासे झाले.

जपानमधील ओकिनावा येथे राहणाऱ्या लोकांचा आहार आणि जीवनशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील लोक दिनचर्येचं तंतोतंत पालन करतात. यामुळे त्यांचे आयुष्य वाढते. आपणही त्यांच्या जीवनशैलीतील वैशिष्ट्यपूर्ण नियमपालनातली शिकवण अंमलात आणू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या लोमा लिंडामधील लोकंही 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे आयुष्य जगतात. येथील लोकांच्या आहारात येथे उगवणाऱ्या वनस्पतींचा समावेश जास्त प्रमाणात असतो. याशिवाय ते व्यायामाला अत्यंत महत्त्व देतात. हे लोकं दररोज व्यायाम करतात.

ब्लू झोनच्या यादीत कोस्टा रिकाच्या निकोयाचाही समावेश आहे. ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचा जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा चालण्यावर जास्त विश्वास आहे. दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी, आहारात अधिकाधिक भाज्या, शेंगा आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करणे हेदेखील फायदेशीर ठरू शकते.