मुलीचा विनयभंग करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डान्स क्लासला गेलेल्या मुलीचा विनयभंग करणाऱया हरीश ब्रिजेश मिश्राला समता नगर पोलिसांनी अटक केली. पॉक्सो कायद्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारदार या कांदिवली परिसरात डान्स क्लासेस घेतात. शुक्रवारी दोन मुली या डान्स क्लासला आल्या होत्या. पहिल्या मजल्यावरून दोन मुली वर जात असताना हरीश तेथे आला. त्याने एका मुलीचा पाय पकडला. या घटनेमुळे दुसरी मुलगी घाबरून वर पळाली. हरीशने एका मुलीला जवळ ओढले. मुलीने तिची कशीबशी सुटका केली. त्यानंतर हरीश तेथून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. या घटनेची माहिती कळताच तक्रारदार यांनी समता नगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासाकरिता एक पथक तयार केले. पोलिसांनी कांदिवली परिसरात नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान हरीश हा पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये आला. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.