
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून जनतेत मोठा संताप होता. यामुळे गेला जवळजवळ सव्वा महिना या इंधनाच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांकडून वाढ झाली नाही. मात्र पेट्रोल १६ पैसे तर डिझेल १२ पैशांनी प्रतिलिटरमागे महाग केले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८३.१४ रुपये एवढे तर डिझेल प्रतिलिटर ७१.६६ रुपये एवढे झाले आहे.
दिल्लीत पेट्रोल ७५.५५ रुपयांवरून ७५.७१ रुपये तर डिझेल ६७.3८ रुपयांवरून ६७.५ ० पैसे झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन झाल्याने हे दर वाढविण्यात आले आहेत. मे महिन्यात १६ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती.


























































