Photo – पुण्यातील डी. ई. एस. पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांची अनोखी आरोग्य वारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
आषाढ महिना सुरू होताच वेध लागतात ते वारीचे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी पायी वारी होणार नाही. पंढरपूरला जाणे प्रत्येकाला शक्य नसते म्हणुन टिळक रस्त्यावरील डी. ई. एस. पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी पालखी सोहळा साजरा केला.
आषाढ महिना सुरू होताच वेध लागतात ते वारीचे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी पायी वारी होणार नाही. पंढरपूरला जाणे प्रत्येकाला शक्य नसते म्हणुन टिळक रस्त्यावरील डी. ई. एस. पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी पालखी सोहळा साजरा केला. सर्व फोटो – चंदकांत पालकर
आरोग्याचा जागर करणारी 'आरोग्य वारी' काढण्यात आली. सजवलेल्या एका पालखीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा, ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यात आला होता
आरोग्याचा जागर करणारी ‘आरोग्य वारी’ काढण्यात आली.सजवलेल्या एका पालखीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा, ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यात आला होता.
दुसर्‍या सजवलेल्या "आरोग्य" पालखीमध्ये मास्क, सॅनिटाझर, हॅन्ड वॉश, कोविडला दूर ठेवण्यासाठी लस घ्या असा संदेश देत शाळेची आरोग्य वारी निघाली. कोरोनामुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित अंतर राखावे, मास्क वापरावा, स्वच्छता राखावी असा संदेश देत ही वारी काढण्यात आली.
दुसर्‍या सजवलेल्या “आरोग्य” पालखीमध्ये मास्क, सॅनिटाझर, हॅन्ड वॉश, कोविडला दूर ठेवण्यासाठी लस घ्या असा संदेश देत शाळेची आरोग्य वारी निघाली. कोरोनामुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित अंतर राखावे, मास्क वापरावा, स्वच्छता राखावी असा संदेश देत ही वारी काढण्यात आली.

arogya-wari-4

या सोहोळ्यादरम्यान शिक्षिकांनी शाळेचा परिसर रांगोळ्या, फुलांनी सजवला. रिंगण सोहोळा, झिम्मा, फुगडी खेळली. पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत विठ्ठलाची आरती करून सोहळ्याचा समारोप झाला.
या सोहोळ्यादरम्यान शिक्षिकांनी शाळेचा परिसर रांगोळ्या, फुलांनी सजवला. रिंगण सोहोळा, झिम्मा, फुगडी खेळली. पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत विठ्ठलाची आरती करून सोहळ्याचा समारोप झाला.
पालखी सोहळा काढण्यापूर्वी मास्क कसा बनवायचा याचे प्रशिक्षण व्हिडीओच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी विदयार्थ्यांना दिले. मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले जवळपास 1 हजार मास्क पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी सांगितले.
पालखी सोहळा काढण्यापूर्वी मास्क कसा बनवायचा याचे प्रशिक्षण व्हिडीओच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी विदयार्थ्यांना दिले. मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले जवळपास 1 हजार मास्क पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती
शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी सांगितले.