
आमीर खानची लेक आयरा खान ही कायम तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी आयराने तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा पूल पार्टी केली. त्यावेळी वडिलांसमोर बिकीनी घातली म्हणून तिला ट्रोल करण्यात आले होते.

आयराने आज तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत पूल पार्टी करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुपूर व तिच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे तिने या पोस्टसोबत लिहले आहे. मात्र नेटकऱ्यांनी इथेही तिला व नुपूरला ट्रोल केले आहे. नुपूर हा तुझ्या वडिलांच्या वयाचा दिसतो अशा शब्दात नेटकऱ्यांनी नुपूरला ट्रोल केले आहे.


























































