जनसेवा विकास समितीच्या अध्यक्षाचा निर्घृण खून, गोळ्या झाडून कोयत्याने केले वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीच्या अध्यक्षाचा सहाजणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

किशोर गंगाराम आवारे (वय – 50) असे खून झालेल्या अध्यक्षांचे नाव आहे. किशोर आवारे यांनी जनसेवा विकास समितीची स्थापना केली होती. 2017 च्या निवडणुकीत या समितीचे सात नगरसेवक नगरपरिषदेत निवडून आले होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे येथील टोलनाक्याविरोधात त्यांनी नुकतेच आंदोलन त्यांनी बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आवारे आणि उपोषण केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

शुक्रवारी दुपारी आवारे हे तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. घनकचरा व्यवस्थापन या विषयावर त्यांनी बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आवारे हे नगरपरिषदेच्या बाहेर पडत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या सहा मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने डोक्यात वार केले. या हल्ल्यात आवारे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. आवारे यांना सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नगरपरिषद इमारतीच्या पाठीमागील बाजूने दुचाकीवरून पळून जाताना हल्लेखोर ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

ही माहिती मिळताच विविध पक्षांच्या पदाधिकारी नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आवारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आई सुलोचना आवारे या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त काकासाहेब डोळे, विवेक पाटील, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले, पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, डॉ. विवेक मुगळीकर, वसंत बाबर, सत्यवान माने, भास्कर जाधव, सतीश पाटील, रामदास इंगवले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची चार पथके रवाना केली आहेत.

बाजारपेठ बंद

नगरपरिषद आवारात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने तळेगाव हादरले. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच व्यावसायिकांनी आपली दुकाने आणि व्यवहार बंद केले. तणावग्रस्त परिस्थिती पाहता या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सलग दोन हत्यासत्रांनी मावळ हादरले

प्रतिशिर्डी शिरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा 1 एप्रिल 2023 रोजी खून झाला. साई मंदिरासमोर वर्दळीच्या ठिकाणी मित्रांसह गप्पा मारत थांबले असताना तीनजणांनी त्यांचा खून केला होता. या घटनेला सव्वा महिना उलटत नाही तोच किशोर आवारे यांची सहाजणांच्या टोळक्याने पिस्तुलाने गोळ्या घालून आणि डोक्यात वार करून निर्घृण खून केला. आवारे यांचाही वर्दळ असणान्या नगरपरिषद आवारातच दिवसाढवळ्या खून झाला. सव्वा महिन्यात झालेल्या सलग दोन हत्यासत्रांमुळे मावळ तालुका हादरला आहे.