केंद्राप्रमाणे राज्यातही विरोधी पक्षनेता दिसणार नाही, गोयल यांचे परखड मत

624

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचा विजय होणार असून केंद्राप्रमाणे राज्यातही विरोधी पक्षनेता दिसणार नाही, असे परखड मत भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असता गुरुवारी हॉटेल सेंटर पॉईन्ट येथे विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी चर्चा केली. तसेच यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला.

शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा कोणत्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार…

केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र यांच्या नेतृत्वात विकासाची भक्कम घोडदौड सुरू आहे. जनतेचा मोदींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही भाजप- शिवसेना महायुतीचे सरकार स्थानापन्न होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत काही मंत्र्यांना तिकिट नाकारण्यात आले आहे, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. त्यामुळे आता काही मंत्र्यांना उमेदवारी मिळाली नसेल तरी त्यांच्याकडे पक्षाने अन्य जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे काहींनी बंडखोरी केली आहे, यासंदर्भात बोलताना बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही. जनता बंडखोरांना स्वीकारणार नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या