
सामना प्रतिनिधी । देवगड
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र देवगड मार्फत ‘रोप आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत देवगड येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात रोप विक्री स्टॉल १ ते १० जुलै या कालावधीत उभारण्यात आला आहे.
नाममात्र रूपये ८ प्रतिरोप या दराने साग, सुरू, कोकम, बांबू, बेल, काजू, फणस, आंबा, जांभूळ, पेल्टो, फोरम, बहावा व अन्य रोपे विक्रीकरिता ठेवण्यात आली असून वनक्षेत्रपाल प्रकाश बिर्जे, पडेल वनरक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल सुरू असून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.




























































