गाडगीळ पुरस्काराचे आज वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार यांना शुक्रवार, 9 डिसेंबरला गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि ज्येष्ठ समीक्षक मीना गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय येथे संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रज्ञा पवार या ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विभागप्रमुख आहेत