
सामना ऑनलाईन । पुणे
गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या आणि खुनाच्या संशयावरून निलंबित तसेच सध्या तुरुंगात असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला चक्क गृहखात्याकडून थेट उपअधीक्षक पदी बढती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बढती प्रक्रियेसाठी जाहीर झालेल्या २०१८च्या परिपत्रकात २२८व्या क्रमांकावर अभय कुरुंदकर याचं नाव असल्याचं उघड होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या पदोन्नती प्रक्रियेतला गृहखात्याचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. राज्यभर गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर हा मुख्य आरोपी आहे.

अभय कुरुंदकर याच्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचा आरोप आहे. अश्विनी बिद्रे एप्रिल २०१६ पासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली होती.





















































