60 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस नाईक अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सोलापूर

60 हजाराची लाच स्वीकारताना वैराग पोलीस स्टेशनचा बक्कल पोलीस नाईक महेश सतीश पवार (वय 32) याला सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडला.

यातील तक्रारदाराचे मेव्हणे आणि इतर साथीदारांच्या विरोधात वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलीस कोठडी वाढवून न घेण्यासाठी तसेच त्यांना गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक महेश सतीश पवार याने लाचेची मागणी करून 60 हजार रुपये रोख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षक अजितकुमार जाधव,कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ जाधवर, पोह चंद्रकांत पवार, पोका सिद्धाराम देशमुख, प्रफुल्ल जानराव, चालक शाम सुरवस आदींनी पार पाडली.