चंद्रपूरमध्ये ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातल्या माजरी येथे ट्रकने दिलेल्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सूनील खरोले (26) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते शिपाई पदावर माजरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वरोरा येथे कार्यालयीन कामासाठी जात असताना पाटाळा फाटा येथे वाळूने भरलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कैलाश रोडे (22) याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.