बंगालमध्ये तृणमूल आमदारावर छापे, टाळे तोडून पोलीस घरात घुसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदारांवरील हल्ल्यांमुळे राजकीय वाद सुरू असतानाच पश्चिम बंगालमध्ये आज तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. टाळे तोडून पोलीस मित्रा यांच्या घरात घुसले आणि घराची झाडाझडती घेतली.

कमरहाटी येथे मित्रा यांचे ‘उदय व्हिला’ नामक निवासस्थान आहे. हे घर एका केंद्रीय यंत्रणांच्या जागेवर असल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या जागेवर मित्रा यांनी घर कसे बांधले याची चौकशी पोलीस करत आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलीस आज तिथे पोहोचले.