सोशल मीडियावर अफवांचे पेव, ग्रुप अॅडमीनवर होणार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरात समाजकंटक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत असल्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरवीत आहेत. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविणाऱ्या पोलिसांची करडी नजर असून त्यात कोणी आढळून आल्यास त्यावर आणि ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

ग्रामीण भागामध्ये चोरट्यांच्या टोळ्या आल्या, लहान मुले पळविणारी टोळी आली अशा अफवा सोशल मीडियावर महिनाभरापासून फिरत असल्यामुळे नागरिक घाबरून गेले असून ‘त्यांनी गावात, जागते रहो’चा नारा सुरू केला आणि रात्री गावात संशयितरित्या फिरणाऱ्यांना पकडून सरळ चोप देत कायदा हातात घेतला जात आहे. वैजापूर तालुक्यामध्ये नुकतेच जमावाच्या हल्ल्यामध्ये दोन जण मरण पावल्याची घटना ताजी असताना संभाजीनगरातील पडेगाव येथे मुलांचे अपहरण करण्यासाठी साडी घालून आलेल्या दोन बहुरुप्यांना तर वाळूज परिसरात भाड्याचे घर शोधणाऱ्या महिलेस नागरिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये ते तिघे गंभीर जखमी झाले आहेत.