
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवारी, 1 ऑगस्ट रोजी होणाऱया पुणे दौऱयादिवशी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष रस्त्यावर उतरणार आहे. दोन्ही पक्षांच्या आंदोलनांना पुणे पोलिसांनी परवानगी दिल्याने शहरातील वातावरण तापले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसने सकाळी सव्वा दहा वाजता पुणे-सातारा रस्त्यावरील उत्सव बिल्डिंग चौक येथे आंदोलनाची हाक दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपलाही महर्षीनगर येथील झांबरे पॅलेस परिसरात आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे.


























































