मुंबई-नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी शहरांमधील प्रदूषणात वाढ होत आहे. २९ टक्के औद्योगिक कारखान्यांतून धोकादायक रासायनिक वायू हवेत सोडला जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मे २०१८ मध्ये जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राज्यातील सतरा प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

 मुंबईत पन्नास ठिकाणी तसेच पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर व चंद्रपूर या पाच महापालिका क्षेत्रांत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याबाबत तसेच हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत एका कंपनीने पर्यावरणमंत्र्यांपुढे या बाबतीत सादरीकरण केले असून या कंपनीच्या मदतीने मुंबई व राज्यातील अन्य प्रदूषित शहरांत वाहने, इमारतीच्या बांधकामातील धुलीकण, धुरामुळे होणारे प्रदूषण शास्त्रोक्त पद्धतीने कमी करण्यावर भर देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

हवेतील प्रदूषण शास्त्राsक्त पद्धतीने कमी करण्यावर भर असल्याचे नमूद केले आहे. त्याशिवाय हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील सतरा प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे रामदास कदम यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.