Iran–Israel War: विनाशकारी युद्धाच्या उंबरठ्यावर जग? पोप लिओ XIV यांनी दोन्ही देशांना केले संयम बाळगण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या मानवी संकटावर व्हॅटिकन सिटीतून पोप लिओ चौदावे यांनी चिंता व्यक्त केली आहे. “द्वेष आणि हिंसाचार कधीही शांतता प्रस्थापित करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी युद्धाचा निषेध करत दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

वॅटिकनमध्ये जमलेल्या भाविकांना संबोधित करताना पोप म्हणाले की, “इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष पाहून माझे हृदय हेलावून गेले आहे. हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित नसून, यामुळे संपूर्ण जगाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे. निष्पाप लोकांचा बळी जात आहे आणि मुले अनाथ होत आहेत. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना विनंती करतो की, त्यांनी शस्त्रांचा मार्ग सोडून संवादाचा मार्ग स्वीकारावा.”

पोप यांनी आपल्या भाषणात युद्धाच्या भीषणतेवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “विनाशकारी शस्त्रे कधीही कोणाचे भले करू शकत नाहीत. आज जगाला विनाशाची नाही, तर एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांपासून ते शहरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचेच आयुष्य या युद्धामुळे उद्ध्वस्त होत आहे.”