
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांना आनंदवार्ता मिळाली आहे. ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशातच ‘देवरा’च्या निर्मात्यांनी सोमवारी एक धमाकेदार पोस्टर प्रदर्शित केले. यामध्ये ज्युनियर एनटीआर भर समुद्रात नावेत उभा राहून आक्रमक रूपात दिसत आहे. पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. पोस्टर प्रदर्शित करतानाच ‘देवरा’ची पहिली झलक 8 जानेवारी रोजी दिसेल असेही सांगण्यात आले आहे.
‘देवरा 1’चे दिग्दर्शन कोरतला शिवा यांचे आहे. 5 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. यामध्ये जान्हवी कपूर, सैफअली खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील. अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत आहे.






















































