पवई तलाव दुथडी भरुन वाहू लागला, पर्यटकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो : संदीप पागडे

सामना ऑनलाईन । मुंबई

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईपासून जवळ असलेला पवई तलाव रविवारी दुथडी भरून वाहू लागला आहे. या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसले तरी पर्यटकांमध्ये हा परिसर पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे.

शनिवारी सकाळपासन मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. पावसाच्या कोसळधारा सातत्याने सुरू असतानाच शनिवारी पवई तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे पर्यटकांची तिथे मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.