हे तळे…प्राजक्ता जोशी-रानडे यांचे नवे भावगीत

गायिका प्राजक्ता जोशी रानडे यांचे नवं गाणे ‘हे तळं.. ’रसिकांच्या भेटीला आले आहे. रसिकांना भावगीतांची गोडी लागावी, यासाठी प्राजक्ता जोशी – रानडे यांची टीम प्रयत्नशील आहे. कवडसे, बाकऱया भावना या गीतानंतर ‘हे तळं.. या त्यांच्या नव्या गीताला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मनाचं प्रतिबिंब उतरवणारं हे गीत मनाचा ठाव घेताना दिसत आहे.

 प्राजक्ता जोशी रानडे यांची मोठी बहीण सुचेता जोशी -अभ्यंकर यांनी गीत लिहिलं असून संगीतही त्यांचेच आहे. सुचेता जोशी- अभ्यंकर या दिल्ली येथे राहत असून त्यांचे अमलताश आणि अपराजिता हे दोन वाक्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘हे तळं.. चे वैशिष्टय सांगताना प्राजक्ता जोशी रानडे म्हणाल्या, मी आणि ऋषिकेश मुंबईला राहतो.

माझी बहीण दिल्लीला आणि आमच्या व्हिडियोग्राफर अश्विनी अभ्यंकर- घैसास पुण्याला…आमचं गाणं लॉकडाऊनमध्ये अशा तीन ठिकाणांहून तयार झालंय. गाण्याची चाल असो किंवा व्हिडियो संदर्भातील बारकावे, याबाबत पती हृषिकेश रानडे यांची मोठी मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. चांगले शब्द आणि संगीत हा आमच्या टीमचा अट्टहास आहे. अगदी पदरमोड करूनही तो आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, असेही प्राजक्ता यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या