अभिनेते प्रकाश राज लोकसभा लढविणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दक्षिणेमधील अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश राज हे आता राजकारणात उतरणार आहेत. आपण लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार आहोत अशी घोषणा आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा…

एक नवी सुरुवात… अधिक जबाबदारी… तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार आहे. मतदारसंघाची माहिती लवकरच देणार आहे. अब की बार जनता की सरकार… असे प्रकाश राज यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे.