बिकट परिस्थिती पार केली अडथळ्यांची शर्यत, ठाणेकर ब्लेड रनर प्रणवची दुबईत नेत्रदीपक कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जन्मतः उजवा पाय आणि दोन्ही हातांची बोटे अर्धवट असूनही मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रणव देसाई या ठाणेकर धावपटूने दुबईमध्ये झालेल्या विश्व पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन्स स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेसाठी निवड झालेला प्रणव हा पहिलाच ठाणेकर खेळाडू असून महाराष्ट्रातूनही या स्पर्धेसाठी मोजकेच खेळाडू पात्र ठरतात. त्यामुळे ‘ब्लेड रनर’ असलेल्या प्रणवच्या यशाने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला असला तरीही बिकट परिस्थितीच्या ‘ट्रॅक’वर धावताना प्रणवला ‘अडथळ्यांची शर्यत’ पार करावी लागत आहे.

ठाण्यातील माजिवडा येथील लोढा पॅरेडाइज गृहसंकुलात राहणारा प्रणव देसाई याने मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. प्रणव उजव्या पायाने अपंग असल्यामुळे ‘ब्लेड’च्या (कृत्रिम पाय) मदतीने विविध स्पर्धांमध्ये धावतो. याआधी त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून ठाणे शहराचे नाव प्रकाशझोतात आणले आहे. नुकतेच प्रणवने दुबईमध्ये झालेल्या विश्व पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रणवची आई गृहिणी असून वडील खासगी वंâपनीत नोकरी करतात. त्याला कृत्रिम पाय अर्थात ब्लेड बसवण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी मदत केली. ब्लेडची किंमत साडेचार लाखांच्या घरात असते. आतापर्यंत प्रणवसाठी सहा ते सात ब्लेड लागल्याची माहिती प्रणवचे वडील प्रशांत देसाई यांनी दिली. यासोबतच प्रणवचे प्रशिक्षक नीलेश पाटकर, ठाणे पालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, डॉ. मर्चंट तसेच प्रणवच्या आई, आजी यांचे कायम त्याला पाठबळ राहिले असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेने केला गौरव
शिवसेनाप्रणित शिव सामथ्र्य सेनेचे अध्यक्ष संदीप भोज यांच्या मार्गदर्शनाखाली व सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रणवचा व त्याच्या कुटुंबीयांचा त्याच्या यशाबद्दल शिव सामथ्र्य सेनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा अमृता पवार, मुंबई महिला सरचिटणीस ज्योती भोसले, शिवसेना रत्नागिरी संपर्क प्रमुख व घणसोली उपशहरप्रमुख मंगेश साळवी, उपजिल्हा संघटक ओवळा माजिवडा संपदा पांचाळ, ईशान्य मुंबई अध्यक्ष हितेश गायकवाड, सायन कोळीवाडा विधानसभा अध्यक्षा ज्योती ठोंबरे – दांडेकर, ठाणे तालुका उपध्यक्षा मनीषा लोंढे, ओवळा माजिवडा विधासभा अध्यक्षा वैभवी चव्हाण, विधानसभा उपाध्यक्षा सुनीता चुडामासा, ओवळा माजिवडा विधानसभा सचिव सचिन जोईजोडे, शहर अध्यक्षा अंकिता पांचाळ, कोपरी पांचपाखाडी विधानसभा अध्यक्षा हेमांगी राबिवडेकर, विधानसभा उपाध्यक्षा रंजना पाटील, विभाग अध्यक्षा मंदा मिस्त्री, हरिनिवास विभाग अध्यक्षा भारती पवार, संदीप वारिसे आदी उपस्थित होते.