
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईच्या प्रथम गुरव याने पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ या युथ गेम्समध्ये आपली चमक दाखवली. त्याने ज्युडो या खेळातील 55 किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली. प्रथम गुरव हिंदुजा महाविद्यालयात 12वीचे शिक्षण घेत आहे. ज्युडोचे प्रशिक्षक बिली मोर्या कावस, कौशिक, स्वस्तिक आणि शशिकांत शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम गुरवचा खेळ बहरला. फिजियोथेरेपिस्ट एजाज असई यांचीही प्रथम गुरवला मोलाची मदत झाली हे विशेष. सर्वच स्तरातून प्रथम गुरववर कौतुकांचा वर्षाव होत आहे.



























































