साखर होणार कडू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एरवी प्रत्येकाचे तोंड गोड करणारी साखर आता सर्वसामान्यांसाठी कडू होणार आहे. महाराष्ट्रात यंदा साखर उत्पादनात मोठी घट झाली असून उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही घटच होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या साखर उत्पादनाचा विचार करता देशात सुमारे 60-70 लाख मेट्रिक टन साखर कमी असणार आहे. त्याचा थेट परिणाम साखरेच्या होलसेल आणि किरकोळ दरात होणार असून प्रतिकिलोचा दर दोन-तीन रुपयांनी वाढून 43 ते 48 रुपयांवर जाणार आहे.

राज्यात 2022-23 या वर्षाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून गेल्या सहा महिन्यांत 210 साखर कारखान्यांनी 105 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षी याच कारखान्यांनी 137 लाख मेट्रिक टन एवढे विक्रमी साखर उत्पादन केले होते.