माझ्या आईचा अपमान हा सर्व महिलांचा अपमान – मोदी

मतदार अधिकार यात्रेत एका स्थानिक नेत्याने केलेल्या अपमानजनक वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. माझ्या आईचा अपमान हा देशातील सर्व आया-बहिणींचा अपमान आहे, असे मोदी म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये निघालेल्या मतदार यात्रेत एका नेत्याने मोदी व त्यांच्या आईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.