
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले. मोदी जवळपास अर्धा तास जेटलींच्या घरी होती. या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत माहिती मिळालेली नहाी. परंतु याआधी बुधवारी सकाळी दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या जेटली यांनी मोदी यांना पत्र लिहून आपल्याला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पुढील मंत्रिमंडळासाठी आपल्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती केली होती. या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi leaves from the residence of Arun Jaitley. pic.twitter.com/n07Z49ulN5
— ANI (@ANI) May 29, 2019
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at the residence of Arun Jaitley. pic.twitter.com/iy6zn8EbjI
— ANI (@ANI) May 29, 2019
Sources: Prime Minister Narendra Modi will drive down to Arun Jaitley’s residence around 8.30 PM today. PM is likely to ask Arun Jaitley to reconsider his earlier decision and remain in Government. pic.twitter.com/QgaEgyODq6
— ANI (@ANI) May 29, 2019
याआधी बुधवारी जेटली यांनी मोदींना पत्र लिहून आपला मंत्रिमंडळात समावेश करू नका अशी मागणी केली होती. त्यामुळे जेटली आता सक्रीय राजकारणात दिसणार नाही असे स्पष्ट झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला स्वत:साठी, उपचार आणि प्रकृतीसाठी वेळ द्यायचा आहे. जबाबदारी नसल्यास मला प्रकृतीकडे लक्ष देता येईल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Arun Jaitley writes to Prime Minister Narendra Modi-“I am writing to you to formally request you that I should be allowed a reasonable time for myself, my treatment and my health, and, therefore, not be a part of any responsibility, for the present, in the new Government.” pic.twitter.com/ZaeYQH5jrG
— ANI (@ANI) May 29, 2019































































