मुख्याध्यापिकेच्या पतीकडून आदिवासी विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण

1591

महिलांवरील अत्याचारांनी अवघा देश ढवळून निघाला असताना अजून एक भयंकर प्रकरण उघड झालं आहे. एका सातवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या नवऱ्यानेच बलात्कार केला आहे. इतकंच नव्हे तर कित्येक महिने तिच्यावर बलात्कार करून तिचं लैंगिक शोषणही केलं आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, ओदिशा राज्यातील कोरापुट जिल्ह्यात हा प्रकार घडला. इथे राज्य सरकार भटक्या विमुक्त जाती तसेच आदिवासींसाठी निवासी शाळा चालवतं. या शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या 60 वर्षांच्या नवऱ्याने या मुलीवर कर्मचारी वसतीगृहात असताना बलात्कार केला. ही मुलगी उन्हाळी सुट्ट्यांसाठी आई-वडिलांसोबत जाण्याची परवानगी मागण्यासाठी आली होती. त्यानंतर आरोपीने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाल्याचं उघड झालं तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला.

या प्रकरणी मुख्याध्यापिकेने काहीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या वसतीगृहात पुरुषांना परवानगी नसल्याने या प्रकरणात आता तिचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी आरोपीला पोक्सो अंतर्गत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या