ऑक्सिजन टँकरवरून सातारा-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ड्रामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना उद्रेकामुळे सध्या ऑक्सिजनचा विषय अतिशय संवेदनशील झाला आहे. त्यामुळे त्यावरूनही ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, याची प्रचिती आज सातारा येथे आली. मुंबईहून आलेला ऑक्सिजनचा टँकर सातारा जिह्याचा की कोल्हापूर जिह्याचा यावरून शुक्रवारच्या सायंकाळी साताऱयात मोठा ड्रामा झाला. अखेर हा टँकर सातारा जिह्यासाठीचा असल्याचे स्पष्ट झाले आणि कोरोना रुग्णांसह सर्वांच्याच जीवात जीव आला. त्यानंतर त्यातील ऑक्सिजन साताऱयात उतरवून घेतला गेला.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगत वाढे फाटय़ावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईहून आलेला ऑक्सिजनचा टँकर पोलिसांनी अडवला. त्यानंतर ‘कोल्हापूर ऑक्सिजन’ या खासगी कंपनीच्या या टँकरमधून आलेला ऑक्सिजन नक्की कोणाचा याबाबतचा मोठा ड्रामा सुरू झाला. पोलिसांनी याविषयी टँकरचालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने तिढा वाढला. यातून हा ऑक्सिजन सातारा की कोल्हापूर जिह्याचा याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. या घोळात जवळपास सव्वा तास टँकर पोलीस बंदोबस्तात थांबून राहिला. दोन्ही जिल्हाधिकाऱयांमध्ये यातून वाद निर्माण झाल्याची फोडणी दिली गेली. तथापि, याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा होऊन हा टँकर सातारा जिह्यासाठीच आल्याचे स्पष्ट झाले.

एकाच वेळी दोन टँकर निघाल्याने झाला गैरसमज

z एकाच केळी दोन टँकर महामार्गावरून निघाले होते. त्यापैकी कोल्हापूरसाठीचा टँकर पुढे निघून गेला होता. यातून ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली. संबंधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबंध नाही. तो टँकर कोल्हापूर येथील खासगी उत्पादकाचा असून त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिह्यासाठी नाही. कोल्हापूर जिह्यासाठी या कंपनीकडून स्कतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे. हा प्रकार गैरसमजातून झाला असे स्पष्ट करून, संबंधित टँकरमधून 14 टन ऑक्सिजन आला आहे. हा ऑक्सिजन सातारा येथे उतरवून घेतल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.