विद्यार्थिनींना गणितातून शिकवले ‘प्रेमा’चे फॉर्म्युले, व्हिडीओ व्हायरल होताच प्राध्यापक निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । हरयाणा

विद्यार्थिनींना प्रेमाचे फॉर्म्युले गणितातून समजावून देणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. या खास शिकवणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थिनींना प्रेमाचे धडे देण्याप्रकरणी हरियाणाच्या कर्नाल येथील महिला महाविद्यालयाचा प्राध्यापक चरण सिंह याला निलंबित करण्यात आलं आहे. चरण हा वाणिज्य शाखेचा प्राध्यापक आहे. त्याने वर्गात विद्यार्थिनींना प्रेमाचे धडे गणिताच्या माध्यमातून शिकवायचा प्रयत्न केला. त्यात प्रेम, आकर्षण, शारीरिक ओढ अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. त्यानंतर त्याने विद्यार्थिनींना याबाबत काही प्रश्नही विचारले. काही विद्यार्थिनींनी या प्रश्नांची उत्तरंही दिली.

पण, प्राध्यापकाच्या नकळत विद्यार्थिनींनी या प्रेमवर्गाचा व्हिडीओ काढून व्हायरल केला आणि प्राचार्यांकडे त्याची तक्रारही केली. त्यानंतर महाविद्यालयाने त्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.