गडकरी रंगायतनमध्ये होणार नारीशक्तीचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधासह आपल्या अनेक रचनांतून माणसाच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित विविध गोष्टींवर भाष्य केले आहे. व्यवस्थापन, लेखन, काव्य, प्रदूषण, अध्यात्म, सावधपण याबरोबरच स्त्रीमुक्तीचा संदेशही त्यांनी दिला. समर्थांच्या काळातील सामर्थ्यवान महिलांनीही अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. त्या महिलांचे कार्य ‘समर्थकालीन सुपरवुमन’ या आधुनिक कीर्तनातून नव्या पिढीसमोर येणार आहे. कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आक्काबाई, वेणाबाई अशा अनेक सामर्थ्यवान महिलांचे कार्य ‘समर्थकालीन सुपरवुमन’ या कार्यक्रमांतून उलगडले जाणार असून बुधवार 14 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वा. गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून यानिमित्ताने समर्थांच्या काळातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनपद्धतीचा व त्यांच्यामधील ‘सुपरवुमन’ चा मागोवा समीर लिमये घेणार आहेत. त्यांच्या कॉर्पोरेट कीर्तन या उपक्रमालाही समर्थपेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नाममुद्रेचे अनावरण
यावेळी प्रसिद्ध उद्योजक संदीप जोशी, अभिजित सायगावकर व तुषार जोशी यांच्या ‘प्रोमक्राफ्ट’ या नवीन नाममुद्रेचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मराठमोळे उद्योजक एम. व्ही. देशमुख, सॅटर्डे क्लबचे चेअरमन अशोक दुगाडे व सचिव हनुमंत बागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

summary- program on woman power at gadkari rangayatan