
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात पोलिसांनी कारमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीला आणि महिलेला अटक केली आहे. हे दोघे जण निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेला कार उभी करून तेथे सेक्स रॅकेट चालवत होते. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांना त्यांच्या गाडीतून बरेचसे वापरलेले कंडोम सापडले आहेत. याबाबत अधिक चौकशी केली असता हे दोघेही ग्राहकांनी वापरलेले कंडोमच्या आधारे ग्राहकांना ब्लॅकमेल करायचे व त्यांच्याकडून पैसे उकळायचे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशमधील दिलीप कुमार गोयल उर्फ गोल्डी हा वेगवेगळ्या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवतो. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शाहपूर येथील एका फ्लॅटमधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. या ठिकाणाहून अटक केलेल्या तरुणींनी गोल्डी हा हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांना शाहपूर मधील दानापानी हॉटेलजवळ एका कारमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचे समजले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या गाडीत एक वेश्या व तिचा ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. तर गोल्डी देखील गाडीतच पुढच्या सीटवर बसलेला होता. या गाडीत पोलिसांनी शोधाशोध केली असता त्यांना बरेचसे वापरलेले कंडोम मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी गोल्डी व त्या महिलेची चौकशी केली असता त्यांनी या कंडोमच्या आधारे त्यांच्या ग्राहकांन ब्लॅकमेल केल्याचे मान्य केले.
सेक्सनंतर ती महिला ग्राहकांकडून कंडोम घ्यायची मात्र ते टाकून न देता तसेच ठेवायची व त्यानंतर काही दिवसांनी ती व गोल्डी त्या ग्राहकाकडून फोन करून पैशाची मागणी करायचा. तसेच त्यांना कंडोम दाखवून बलात्काराचा आरोप करू अशी धमकी देखील द्यायाचा अशी माहिती दक्षिण झोनचे पोलीस निरीक्षक राहुल लोढा यांनी सांगितले.

























































