पंचतारांकित हॉटेलमधील वेश्याव्यवसाय उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, तिघा दलालांना अटक करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कारवाई करण्यात आलेले हॉटेल हे पुणे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दलाल सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमधील खोली घेऊन दलाल परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घ्यायचे. ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने सर्व व्यवहार करत होते. येथील हॉटेलमध्ये ऑनलाइन वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा

तिघे दलाल अटकेत, चार तरुणी ताब्यात

विभागातील पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, अमित जमदाडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला आणि सापळा लावला. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमित जमदाडे, इरफान पठाण, इम्रान नदाफ आदींनी ही कारवाई केली.