ऐतिहासिक विजासन लेणीवरील बुद्ध मूर्तीची विटंबना, चंद्रपुरात विविध ठिकाणी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर असलेली मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. ही घटना उघडकीस येताच बौद्ध बांधव संतप्त झाले आहेत आणि मोर्चा काढत घटनेचा निषेध करण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील काही शहरात निषेध मोर्चा निघणार आहे.

भद्रावती हे शहर ऐतिहासिक शहर आहे. या शहरातील विजासन टेकडीवर सतावाहन कालीन बुद्ध लेणी आहे. येथे तथागत गौतम बुद्ध आले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळं हे स्थळ बौद्ध बांधवासाठी अतिशय पवित्र आहे. याच टेकडीच्या टोकावर बुद्ध मूर्ती आहे. या बुद्ध मूर्तीची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. घटनेची माहिती मिळताच बौद्ध बांधवानी विजासन लेणीकडे धाव घेतली. बौद्ध बांधवानी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. शहर बंदची हाक दिली.

शहरातील व्यापाऱ्यांना भद्रावती बंदचे आवाहन केले केले. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात आली. मूर्तीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून बौद्ध बांधवांनी केली आहे. आज जिल्हातील काही शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.