अंडरवेयर घालून, अंगाला तेल चोपून महिलांची अंतर्वस्त्रे चोरणारा विकृत अटकेत

सामना ऑनलाईन । पणजी 
पणजी मधील  ताळगाव टेकडीवरील  होरायझन कॉम्प्लेक्स सारख्या हायप्रोफाईल वस्तीतील नागरिक गेल्या 2 महिन्यांपासून एका विचित्र चोरट्यामुळे दहशतीखाली होते. ताळगाव हे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या खासगी निवासापासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री घरात विशेषता: महिलांच्या खोलीत एक विकृत शिरून अश्लील चाळे करायचे आणि स्त्रियांची अंतर्वस्त्रे घेऊन पसार होत असे. त्यामुळे या परिसरातील नागरिक दहशतीखाली होते.
ताळगावात मधील उच्चभ्रू वस्ती मधील लोक या विचित्र चोरामुळे हैराण झाले होते. या विकृताच्या भीतीने अनेक भाड़ेकरूंनी घरं रिकामी करून दुसरीकडे राहणे पसंत केले आहे. हा विकृत फक्त अंडरवेयर घालून आणि अंगाला तेल चोपून मध्यरात्री किंवा भल्या पहाटे महिला असलेल्या घरात शिरायचा मात्र कुणालाही चाहुल लागायच्या आत अंतर्वस्त्रे चोरून पळून जायचा. त्यामुळे त्रस्त झालेल्या रहीवाशांनी शेवटी पणजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पणजी पोलिसांनी तक्रारी मधील वर्णनानुसार महिलांची अंतर्वस्त्र आणि किरकोळ रक्कम चोरुन नेणारा मानसिक विकृत असू शकेल याची कल्पना आल्याने  त्य़ा दिशेने तपासाची चक्रे फिरवली. एका प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालकाच्या मदतीने पोलिसांनी ताळगाव येथील तूळशीदास शिरोडकर (35) याला अटक केली असून त्याच्या घरातून महिलांच्या अंतर्वस्त्रांचे घबाड सापडले आहे.