Video पुण्यात गणपती देखाव्याच्या कळसाला आग; जे पी नड्डा यांच्या हस्ते आरती सुरू असताना घडला प्रकार

फोटो - चंद्रकांत पालकर

पुण्यातील आंबीलोढा कॉलनी नजीक साने गुरूजी नगर येथील साने गुरुजी तरण मंडळाच्या देखाव्याला आग लागली आहे. या मंडळाने मंदिराचा देखावा केला होता व अचानक मंदिराच्या कळसाने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान भाजपचे पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आरती सुरू असताना हा प्रकार घडल्याचे समजते.

आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या दोन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे.  सुदैवाने या दुर्घटनेत जखमी किंवा जिवितहानी झालेली नाही.