
शहरातील जांभुळवाडी आणि खडकी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात महिलेसह तरूण ठार झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्ता ओलांडत असताना भरधाव डंपरचालकाने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाली. हा अपघात काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जांभुळवाडीत घडला. कविता फडतरे (वय 36, रा. वारजे माळवाडी ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमंलदार अजित कोकरे यांनी फिर्याद दिली आहे. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला.
दुसऱ्या अपघातात भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरूण ठार झाला. हा अपघात 21 मार्चला खडकीतील एका खासगी शाळेसमोर घडला. उपचारादरम्यान काल तरूणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . राजेंद्र चंद्रभान आव्हाड (वय 29, रा. पिंपळे गुरव ) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिस तपास करीत आहेत.






























































