पुणे – शतपावली करणाऱ्या तरुणीची सोनसाखळी हिसकाविली

रात्रीचे जेवण केल्यानंतर घराशेजारील रस्त्यावर शतपावली करणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील 23 हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेली. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री नऊच्या सुमारास चंदननगर-खराडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका खासगी कंपनीत कामाला असून चंदननगरमध्ये राहायला आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर ती रस्त्यालगत शतपावली करीत होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने तरुणीच्या गळ्यातील 23 हजारांची सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली. आरडा-ओरडा करेपर्यंत दुचाकीस्वार चोरट्याने पळ काढला. याप्रकरणी चंदननगर पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या