
पिस्तूल बाळगणार्या सराईताला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सागर बबन पारीटे (35, रा. लोअर इंदिरा नगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मार्केटयार्ड गोल बिल्डींगचे मागे एकजण उभा असून तो अवैध्यरित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून सागर पारिटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आला. ही कामगिरी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.




























































