खुनाचा प्रयत्न करून पसार झालेले जेरबंद, एका महिलेसह तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

पुनम निलेश वाडकर, ओंकार चंद्रकांत बेलुसे (23, रा. पर्वती), राम राजेंद्र अवचट (21, रा. पर्वती) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील बेलूसे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वाडकर, बेलूसे आणि अवचट यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा केल्यानंतर ते पसार झाले होते. आरोपींच्या मागावर असतानाच संशयित आरोपी हे पद्मावती कॉर्नर भागात असल्याची माहिती अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांना मिळाली. यानुसार, दोघांना ताब्यात घेण्यात आले, तर वाडकर हिला जनता वसाहत भागातून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.