Pune crime news आर्थिक व्यवहारातून तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीला बेड्या, 12 तासात सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक व्यवहारातून तरुणाचे अपहरण केलेल्या टोळीला वानवडी पोलीस आणि युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या 12 तासात अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

प्रविण शशिकांत पाटील ऊर्फ मोहमंद परवेझ शेख, (वय – 39, रा. लोहगांव बस स्टॉप जवळ) असे सुटका केलेल्याचे नाव आहे. दत्तात्रय श्रीराम वारिंगे (वय – 39, रा. तळेगाव दाभाडे), महेश ब्रम्हदेव जाधव (वय – 32, रा. वाघेला पार्क कॉलनी, भारत पेट्रोलपंपाजवळ, तळेगाव दाभाडे स्टेशन), सुभाष गोपाळ सोनजारी, (वय – 40, रा. तळेगाव दाभाडे) आणि रवि हनुमंत अंकुशी (वय – 34, रा. सोनझरी वस्ती, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे.

आर्थिक व्यवहारातून वानवडीतील फातिमानगर चौकात एकाला बोलावून मारहाण करुन जबरदस्तीने अपहरण केल्याची तक्रार वानवडी पोलिसांना प्राप्त झाली. आरोपींनी अपहरण केलेल्या तरुणाच्या पत्नीला फोन करून 8 लाख रुपयांची मागणी केली. आरोपी अपहरण केलेल्या तरुणाला तळेगाव दाभाडे येथे घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपहरणकर्त्यांनी तरुणाच्या घरच्यांना फोनवरुन धमकी दिल्याने वानवडी पोलीस आणि युनिट चारने संयुक्तिकरित्या 8 लाख रोख रक्कम (बनावट चलनी नोटा) सापळा रचून आरोपींना अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विक्रांत देशमुख, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी पौर्णिमा तावरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप शिवले , युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय जयवंत जाधव, युनिट चारचे एपीआय विकास जाधव,उप निरिक्षक अजय भोसले, उप-निरिक्षक अजय शितोळे, पोलीस अमंलदार संतोष नाईक, अतुल गायकवाड,सचिन बोराटे, निळकंठ राठोड, अनिकेत वाबळे, अमोल जाधव हरिश मोरे, विठठ्ल वाव्हळ, अजय गायकवाड,नागेशसिंग कुंवर, रमेश राठोड यांनी केली.