शरिरसंबंधासाठी पत्नीला अश्लिल व्हिडीओ दाखवून जबरदस्ती, पतीवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शरिरसंबंध प्रस्तापित करण्यासासाठी पत्नीला जबरदस्ती करणाऱ्या आणि अश्लील व्हिडिओप्रमाणे कृती न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या पती विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय सासू, सासरे आणि नणंदेवरही कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा हडपसर परिसरातील तरूणासोबत मागील वर्षी विवाह झाला होता. चार ऑक्टोबर 2020 ते 11 डिसेंबर 2020 या कालावधीत पीडित महिला सासरी राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांना पती मोबाईलमध्ये अश्लिल व्हीडीओ दाखवून त्या व्हीडीओप्रमाणे जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सांगत होता. ‘तू असे केले नाही, तर दोघेही मोठ्या गाडीखाली आपली गाडी घालून आत्महत्या करू,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने तक्रारीत केला आहे. त्याशिवाय लग्नाआधी तरूणावर मानसोपचार तज्ज्ञाकडून औषधोपचार सुरू असल्याचे लपवून ठेवल्याचे फिर्यादीतून नमूद करण्यात आले आहे.